एक दारुडा, नशेत धुत्त आपल्या समोर असलेल्या दारूच्या बाट ल्यातुन एक रिकामी बाटली उचलत म्हणाला -
" तुझ्या मुळ माझी बायको मला सोडून गेली '' आणि त्याने ती बाटली जोरात जमिनीवर पटकून तोडून टाकली.
मग दूसरी रिकामी बाटली उचलत तो म्हणाला -
" तुझ्या मुळ माझ घर बर्बाद झाल " आणि त्याने तीही बाटली जमिनीवर आपटून फोडून टाकली.
नंतर तीसरी रिकामी बाटली उचलत तो म्हणाला -
" तुझ्या मुळ माझी जिंदगी तबाह झाली " आणि त्याने तीही बाटली जमिनीवर आपटून फोडून टाकली.
आता शेवटची पाचवी बाटली , जी की भरलेली होती , उचलत तो म्हणाला -
" तू कशाला घाबरते ... तुझी काही चुक नाही ... उलट एवढ सगळ झाल असतांना तूच तर माझ्या जगण्याचा आधार आहेस ...." म्हणत त्याने झाकण उघडून टी बाटली तोंडाला लावली ...


No comments:
Post a Comment