काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.
आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.
देवाने कोंबडी आधी निर्माण केली की अंडं... ? सरांनी पोरांना बुचकाळ्यात टाकण्यासाठी प्रश्न विचारला.
बराच वेळ सगळा वर्ग बुचकाळ्यात पडला. थोड्या वेळाने एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं.
विद्यार्थी - सर कोंबडी.
सर - कश्यावरुन?
विद्यार्थी - कारण ... जर देवाने अंडं आधी निर्माण केलं असतं तर देवालाच नाही का त्या अंड्यावर बसावं लागलं असतं.
आपल्या बिमार कर्मचारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली - यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .
पती - ... कसं काय ?
बीवी - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...
गाढवासारखे दिवसभर काम करता ...
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...
माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...
आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... !!
Sent by - Vikas Naik